शिवजयंतीनिमित्त करमाळा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

करमाळा(दि.२५) : करमाळा येथील श्री गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्यावतीने गणेश जयंती व शिवजयंती निमित्त करमाळा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पोर्ट्स क्लबचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. करमाळा येथील जीन मैदान येथे या स्पर्धा पार पडणार असून बुधवार दि.२९ जाने. ते रविवार दि.२ फेब्रु.२०२५ पर्यंत असणार आहेत.

या स्पर्धेचा पहिला सामना करमाळा पत्रकार संघ विरुद्ध करमाळा पोलीस संघ असा मैत्रीपूर्ण सामना खेळविला जाणार असून स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट खेळाडू निवडून त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे अमित बुद्रुक यांनी दिली
या सर्व सामन्यांचे यु ट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमिंना हे सर्व सामने यु ट्यूब वरती पाहता येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषक १ लाखाचे तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ७० हजाराचे तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ५० हजार व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक ३० हजाराचे असणार आहे.
गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब यंदाच्या वर्षी गणेश जयंती शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात आनंदात साजरी करण्यात येणार आहे यावर्षी होम हवन सहस्त्र आवर्तन गणेश याग करून सायंकाळी ६ ते १० या वेळेत महाप्रसाद देऊन गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा शहरातील भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब दरवर्षीप्रमाणे गणेश जयंती उत्सव शहरातील वेताळपेठ येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊन संपूर्ण करमाळा शहरातील नागरिकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. गजानन स्पोर्टर्स ॲण्ड सोशल क्लबच्यावतीने आयोजित गणेश जयंती उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभागी होतात. शिवजयंती गणेश जयंती उत्सव मोठया साजरा होणार असल्याचे अध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे.
या स्पर्धा शिवजयंती निमित्ताने क्रिकेट स्पर्धा गणेश जयंती निमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमासाठी गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत.






