करमाळ्यात स्वतंत्र बांधकाम कार्यालय सुरू होणार – चिवटे यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा (दि.१) – करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगार व संघटित कामगारांना शासकीय योजनांचे अर्ज देणे व त्याचा लाभ घेणे यासाठी सोलापूरला जावे लागते. करमाळा पासून सोलापूर 135 किलोमीटर अंतरावर असून या यासाठी करमाळ्यात स्वतंत्र बांधकाम कार्यालय काढावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती याची दखल घेऊन बांधकाम आयुक्त यांनी करमाळा येथे नवीन बांधकाम कार्यालय मंजूर केले असून लवकर त्याचे उद्घाटन केले जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे बांधकाम आयुक्त विवेक कुंभार यांनी दिले.
मुंबई येथील बांद्रा संकुल येथील बांधकाम आयुक्तांच्या कार्यालयात विवेक कुंभार यांची चिवटे यांनी भेट घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनी वरून तात्काळ करमाळ्याला बांधकाम कार्यालय सुरू करा असे आदेश दिले होते. या करमाळा बांधकाम कार्यालयात तीन क्लार्क एक मॅनेजर व दोन शिपाई अशी पदे मंजूर झाली असून यासाठी लवकर जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
या मंजुरी नंतर बोलताना महेश चिवटे म्हणाले की आता बांधकाम कामगारांना करमाळ्यातच नोंदणी करण्यात येणार आहे यामुळे त्यांना त्यांची सर्व लाभ त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती व बांधकाम कामगारांच्या साठी शासनाने केलेले 28 योजनांचा लाभ करमाळ्यातच मिळणार आहे. याशिवाय बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकाला स्वतंत्र घर देण्यासाठी शासन जागा उपलब्ध करून देणार आहे वेळप्रसंगी गृहनिर्माण संस्था तयार करून संस्था शहरालगत जागा खरेदी करू बांधकाम कामगारांसाठी घरी बांधून देणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी स्वतंत्र बांधकाम कार्यालय मंजूर केल्यामुळे बांधकाम कामगारांची प्रश्न सुटणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांना भेट दिली आहे असे मत बांधकाम कामगार समन्वयक तथा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी व्यक्त केले आहे.