महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी करमाळा येथे 'अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर’ संपन्न - Saptahik Sandesh

महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी करमाळा येथे ‘अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर’ संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शासन आपल्या दारी अभियानातंर्गंत तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर दि.२६ मे रोजी करमाळा येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम करमाळा पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,नायब तहसीलदार विजय जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने मलिांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला व बालविकास विभागामार्फत महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात येतो.

यामध्ये सर्व प्रशासकीय विभाग सहभागी होऊन समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या शिबीरांचा मुख्य उद्देश होता. या झालेल्या कार्यक्रमात महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!