श्री कमलादेवी कन्या विद्यालयात "बाल आनंद बाजार" उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

श्री कमलादेवी कन्या विद्यालयात “बाल आनंद बाजार” उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शहरातील श्री कमलादेवी कन्या विद्यालय येथे आज शुक्रवारी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने प्रचाराच्या वतीने बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक व भाजपा तालुकाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी केले.

यावेळी सरपंच डॉक्टर अभिजीत मुरूमकर मिरगव्हाण सरपंच मच्छिंद्र हाके , सरपंच गपाट वंजारवाडी चे सरपंच प्रतीक्षा बिनवडे तसेच संस्थेचे संचालक श्याम पुराणिक . महेश परदेशी प्रशालेच्या मुख्यध्यापिका श्रीमती शेलार मॅडम सर्व शिक्षक व असंख्य पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी असंख्य प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ह्या खरेदीचा आनंद प्रशाला मधील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात घेतला या बाल आनंद बाजारात 25 हजार रुपये पेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाली, यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व पालक व पदाधिकारी यांचे आभार प्रशालेच्या सर्व शिक्षकांच्यावतीने व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!