केम येथे भैरवनाथ जन्मोत्सव मोठया ऊत्साहात साजरा
केम(संजय जाधव) – केम येथील तळेकर गल्लीतील, जागृत भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ह.भ.प.गणेश भोरे.ह.भ.प. सुधीर महाराज वालवडकर.ह.भ.प. शुभम महाराज वसंतगडकर. झी टाकिज फेम ह.भ.प. ज्ञानेश्वरी ताई घाडगे.ह.भ.प लालासाहेब चोपडे महराज यांची कीर्तने झाली
भैरवानाथ जन्माचे कीर्तन ह.भ.प.ज्ञानेश्वरी ताई घाडगे यांचे रात्री १० ते १२ या वेळेत झाले बरोबर १२ वा.५मी भैरवनाथ जन्म झाल्यानंतर मंदिरात गुलालाची उधळण करूण पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महिलानी भैरवनाथाचा पाळणा म्हटला. या वेळी मोठया प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. भैरवाथ जन्मादिवशी पुणे येथील उद्योजक आजीनाथ लोकरे यांच्या वतीने हजोरो भाविकांना मिष्टान्न
या उत्सवासाठी भैरवनाथ भक्तगणांनी अहोरात्र परिश्रम घेतले.