करमाळ्यासह मतदारसंघातील मोठ्या गावांतून मिळालेल्या लीड मुळेच पाटील यांचा विजय झाला सोपा - Saptahik Sandesh

करमाळ्यासह मतदारसंघातील मोठ्या गावांतून मिळालेल्या लीड मुळेच पाटील यांचा विजय झाला सोपा

आमदार नारायण पाटील

करमाळा (दि.२५) –   करमाळ्यासह मतदारसंघातील मोठ्या गावांतून नारायण आबा पाटील यांना लीड मिळाल्यामुळेच पाटील यांचा विजय सोपा झालेला आहे.

यश कलेक्शन, करमाळा

करमाळा विधानसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे विक्रमी मतदान म्हणजे ९५११९ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे (मते ७८०१०) यांचा १७१०९ मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानावर गेले असून त्यांना ४०८३४ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार प्रा.रामदास झोळ यांना ४७२२ एवढी मते मिळाली आहेत.

पाटील यांचा १६ हजार १९ मतांनी नव्हे तर १७ हजार १०९ मतांनी विजय

मतमोजणी झाल्यानंतर नारायण (आबा) पाटील हे १६ हजार १९ मताधिक्याने विजयी झाले; अशी माहिती समोर आली होती हीच माहिती सर्व प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून मतांची जी अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यानुसार नारायण (आबा) पाटील हे १७ हजार १०९ मतांनी विजयी झाले आहेत.

मोठया गावांमध्ये पाटील यांना मिळालेल्या लीड बद्दल आकडेवारी खाली दिली आहे.

  • करमाळा : २०२४ मध्ये नारायण पाटील यांना ६५७४ तर संजयमामा शिंदे यांना २७४७ मते मिळाली आहेत; पाटील यांना ३८२७ मतांची आघाडी मिळाली. सन २०१९ मध्ये संजयमामा यांना ५१४९ मते तर नारायण पाटील यांना ३०२३ मते मिळाली होती. शिंदे यांना २१२६ मताची आघाडी मिळाली होती.
  • केम येथे नारायण पाटील यांना २८०५ तर संजयमामा यांना १००० म्हणजे येथे १८०५ मताचे लीड पडले आहे.
  • वांगी येथे पाटील यांना २७७६ तर संजयमामा यांना ११९० येथे १५८६ मताचे लीड पडलेले आहे.
  • जेऊर येथे पाटील यांना २५१६ तर संजयमामा यांना ५३२ मते मिळाली. येथे १९८४ मताचे लीड मिळालेले आहे.
  • वरकुटे येथे पाटील यांना ९४० तर संजयमामा यांना २१६ येथे ७२४ मताचे लीड पडलेले आहे.
  • आवाटी येथे पाटील ८२१ तर संजयमामा यांना २८५ येथे ५३६ मताचे लीड पडलेले आहे.
  • उमरड येथे पाटील यांना १२२२ तर संजयमामा यांना ७०० मते मिळाले असून येथे ५२२ मताचे लीड मिळाले आहे.
  • शेलगाव वांगी येथे पाटील यांना १४५९ तर संजयमामा यांना ३१६ येथे ११४३ मताचे लीड मिळालेले आहे.
  • निंभोरे येथे पाटील यांना १२५७ तर संजयमामा यांना ३८४ येथे ८७३ मताचे लीड मिळालेले आहे.
  • साडे येथे पाटील यांना ११७८ तर संजयमामा यांना ६८३ मते मिळाले असून येथे पाटील यांना ४९५ मताचे लीड मिळाले आहे.
  • मिरगव्हाण येथे पाटील यांना ७२५ तर संजयमामा यांना ११० मते मिळाले असून येथे पाटील यांना ६१५ मताचे लीड मिळालेले आहे.
  • लव्हे येथे पाटील यांना ८१६ तर संजयमामा यांना १३० मते मिळालेली आहेत. येथे ६८६ मताचे लीड मिळाले आहे.
  • टाकळी येथे पाटील यांना ९५६ तर संजयमामा यांना २६२ मते मिळाले आहेत. येथे ६९४ मताचे लीड पाटील यांना मिळाले आहे.
  • केत्तूर येथे पाटील यांना १४८६ तर संजयमामा यांना ४९७ मते मिळाले आहेत. येथे पाटील यांना ९८९ मतांचे लीड मिळाले आहे.
  • वीट येथे पाटील यांना १७०८ तर संजयमामा यांना ८४२ मते मिळाले आहेत. येथे पाटील यांना ८६६ मतांचे लीड मिळाले आहे.

अशाप्रकारे करमाळा तालुक्यातील मोठ्या गावातून पाटील यांना लीड मिळाल्यामुळे निवडणुकीतील विजय सोपा झाला आहे. एवढेच नव्हेतर ३६ गावामध्येही सन २०१९ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पाटील यांनी चांगले मतदान घेतले आहे.

  •  कुर्डु  येथे २०१९ मध्ये पाटील यांना १२५० मतदान झाले होते. यावेळी १६२२ असे मतदान झाले आहे.
  • कुर्डुवाडी येथे २०१९ ला पाटील यांना १६३० मतदान झाले होते. यावेळी ४२९३ मतदान झाले आहे.
  • म्हैसगाव येथे २०१९ ला ३९७ मतदान झाले होते, तर यावेळी १०७६ मतदान झाले आहे.
  • पिंपळखुंटे येथे संजयमामा पेक्षा २६ मते जास्त मिळवली आहेत. येथे आबांना ७२३ तर संजयमामा यांना ६९७ मते मिळाली आहेत.
  • बिटरगाव येथे पाटील यांना ४७१ तर संजयमामा यांना १९० मते मिळाली आहेत. येथे पाटील यांनी २८१ मताचे लीड मिळवले आहे.
  • रोपळे येथे यावेळी ११२८ मते मिळवली आहेत.

अशाप्रकारे ३६ गावातून पाटील यांना मिळालेले लीड हे त्यांना मोठ्या प्रमाणात यश देऊन गेले आहे.

करमाळा विधानसभेची गावनिहाय मतांची आकडेवारी साप्ताहिक संदेशच्या पीडीएफ मध्ये पहा!Saptahik Sandesh Epaper 🔗

करमाळा तालुक्यात १७ व्या फेरीपर्यंत श्री.पाटील यांना ७३०७८ मतदान झाले होते. तर संजयमामा शिंदे यांना ३९८१९ मते मिळाली. श्री. पाटील यांना एकूण ३३२५९ मताचे जे लिड मिळाले ते लिड श्री. शिंदे तोडू शकले नाहीत. याउलट माढा तालुक्यातही पाटील यांना २१०५६ इतके मतदान झाले. संजयमामा यांना ३७५५१ मतदान झाले तर बागल यांना ६३७८ मतदान झाले. यावेळी बागल जास्त मते घेऊ शकले नाहीत. किंबहुना मतदारांनी मतविभागणी टाळली. त्याचा फायदा पाटील यांना झाला. पहिल्या फेरी पासूनच पाटील आघाडीवर होते.

ती आघाडी १० व्या फेरीपासून गतिमान झाली. १७ व्या फेरी पर्यंत लिड वाढत गेले. १८ व्या फेरी पासून शिंदे यांना लिड मिळत गेले, पण पाहिजे त्या पटीत लिड मिळू न शकल्याने पाटील हे १७१०९ मतांनी विजयी झाले.

पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेऊर येथे भव्य मिरवणूक काढली होती

निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत बंधु, वीटचे राजेंद्रसिंह राजेभोसले, कंदरचे भास्कर भांगे, राष्ट्रवादीचे संतोष वारे यांच्यासह जगताप समर्थक व पाटील समर्थक यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. काहींनी फटाके उडवून, गुलाल उधळून तर काहींनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

पाटील यांनी विजयानंतर अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!