करमाळा तालुक्यातील २५ दारू विक्रेत्यांवर पोलीसांची मोठी कारवाई – २५ हजार ४९० रू. मुद्देमाल जप्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी पोलीसांनी २५ अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून जवळपास २५ हजार ४९० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे.

यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव, गाव व जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे..पोफळज – रमेश पंढरीनाथ पवार (वय ५८) ७७० रू. चा माल जप्त., केम – दादा जनार्दन अवघडे १२०० रू. चा माल जप्त. करमाळा शहर ( साठेनगर) – सुनिल विलास आलाट ( वय – ३७) १००० रू.चा माल जप्त, कंदर – विष्णू चिमाजी लष्कर ६०० रू. चा माल जप्त, वंजारवाडी • विश्वनाथ विलास वाघमोडे (वय – ३२) १२०० रू. चा माल जप्त., चिखलठाण नं.१ – लालचंद किसन भोसले (वय – ४९) ९०० रू. चा माल जप्त., भालेवाडी – दत्तात्रय गेनबा तरंगे (वय – ७०) १५४० रू. चा माल जप्त, रावगाव – महादेव संपत पवार (वय ४५) १२०० रू. चा माल जप्त.

रावगाव – प्रकाश श्रीरंग शिंदे (वय ५५) १००० रू. चा माल जप्त, करंजे – आण्णासाहेब शंकर नरूटे (वय ४२) १४०० रू. चा माल जप्त, पोथरे – दत्ता शिंदे (वय – ३०) ११२० रू. चा माल जप्त., . पोथरे – छाया मच्छिंद्र जाधव (वय ६५) ६०० रू. चा माल जप्त., आवाटी – दत्तात्रय झुंबर काळे (वय – ४०) ९१० रू. चा माल जप्त., आवाटी निजाम खान (वय – ४९), ८४० रू. चा माल जप्त., मांजरगाव चंद्रकांत आक्रुश चव्हाण (वय – ३६) ७०० रू. चा माल जप्त., केम मारूती भानुदास अवघडे (वय-५६) १२०० रू. चा माल जप्त, करमाळा (चांदगुडे गल्ली) राजेश शिवाजी दगडे ( वय – ३२), १००० रू. चा माल जप्त, करमाळा(बायपास रोड ) – ( वय – २२) १४१० रू. चा माल जप्त.

टाकळी चौक – पोपट रतिलाल कर्चे (वय-३५) १४०० रू. चा माल जप्त., वाशिंबे – विलास निवृत्ती झोळ (वय – ४८) १००० रू. चा माल जप्त., भाळवणी – तानाजी शिवाजी काळे (वय-३४) ४९० रू. चा माल जप्त., पोफळज – करीना रविंद्र काळे (वय २०) १५०० रू. चा माल जप्त., दहिगाव – सीमा बापू सलगर (वय – ४८) ९०० रू. चा माल जप्त., पांगरे – सतीश विनायक पारेकर (वय – ४१) ७०० रू. चा माल बाबाजान, असा एकूण २५ हजार ४९० रूपयाचा मुद्देमाल करमाळा पोलीसांनी जप्त केला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!