पांगरे येथे बहीण-भावाचा बुडून मृत्यू..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खड्ड्यात पडून बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पांगरे (ता.करमाळा) येथे काल (ता.२२) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यात हकीकत अशी की पांगरे येथे हिंगोली जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी कामगार आले असून, या ऊसतोड मजुरातील एका मजुराची ही दोन मुले आहेत, यामध्ये प्रतीक्षा श्रावण चव्हाण (वय-१३) व पृथ्वीराज श्रावण चव्हाण (वय-९) अशी मृत झालेल्या दोन बहिण भावांची नावे आहे.
जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खड्ड्यात हे दोघे खेळत असताना या पाण्यात पडले व पोहता येत नसल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला, या घटनेनंतर त्याच दिवशी सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास मुले घरी आली नसल्याने त्यांचा शोध सुरु झाला व त्यानंतर दरम्यान खड्ड्याजवळ चप्पल दिसली. त्यानंतर खड्ड्यात शोधले तेव्हा त्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर पांगरे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
