अखेर ३४ वर्षांनी आम्ही मित्र महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र भेटलो

अखेर ३४ वर्षांनंतर बार्शीच्या (जि.सोलापूर) श्री शिवाजी महाविद्यालयात १९८९ साली बीएससी (B.Sc) करणारे आम्ही मित्र काल (रविवार दि. 22) पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र भेटलो.1989 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी वकील प्रदीप भोसले यांनी केले. यानंतर संस्थेचे सचिव पी. टी. पाटील कार्याध्यक्ष शितोळे साहेब गुरुवर्य प्राध्यापक वर्ग यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधि म्हणून मी( प्राध्यापक धनंजय पन्हाळकर) मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय, नोकरीचे ठिकाण,कौटुंबिक माहिती असा परिचय करून दिला.
दुपारी मान्यवराच्या सोबत सहभोजन झाले. सहभोजन झाल्यानंतर महाविद्यालयातील सर्व डिपार्टमेंटला तसेच ग्रंथालय गार्डन व इतर परिसर यांना सर्वांनी भेटी दिल्या . डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या वापरात आलेल्या वस्तूंचे संग्रहालय सर्वांना खूपच आवडले कारण यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी मामासाहेब जगदाळे यांना जवळून पाहिले होते तसेच त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. दुपारच्या सत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींचा उन्हाळा दिला त्यामध्ये बबन साळुंखे PSI यांनी अतिशय सुंदर कविता सादर केली. अनंत सूर्यवंशी सरांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केल्याचे अनुभव सांगितले कुलकर्णी सरांनी तर महाविद्यालयाचे आपले अनुभव सांगत असताना अतिशय हास्यांचा कल्लोळ उडवला. टि. के. चव्हाण महाराष्ट्र राज्याचे उपसचिव सॉलिसेटर यांनी आपले न्यायालयीन अनुभव व्यक्त केले.भाऊसाहेब भांडवलकर यांनी मी शिक्षकीपेशा सोडून पॅथॉलॉजीकडे कसे वळलो हे सांगितले.
अशा अनेक उच्च पदावर असणाऱ्या सर्व मित्रांच्या भेटी ३४ वर्षांनी झाल्या होत्या बरेचसे मित्र एकमेकाला ओळखू शकले नाहीत महाविद्यालयातील प्राचार्य शेख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . प्राचार्य देखील 1988 च्या बॅचचे होते त्यामुळे ते देखील आम्हा सर्वांना ओळखत होते त्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले आणि जड अंतकरणाने कार्यक्रमाचा शेवट झाला आपण या संस्थेचे ऋण फेडावे या उद्देशाने B.Sc. बॅच 1989 तर्फे आपण या महाविद्यालयाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून महाविद्यालयासाठी रोख रुपये 51 हजाराचा चेक देण्यात आला.
अतिशय हलक्याची परिस्थिती असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीर मामासाहेब नगरीमध्ये सर्व माजी विद्यार्थी नतमस्तक झाले. यावेळी महाविद्यालयाचे आमच्या बॅचला शिकवत असणारे प्राध्यापक आर बी कुलकर्णी ,पाटील सर ,डॉक्टर कराड सर ,शिंदे मॅडम, जाधव मॅडम ,लोखंडे सर ,डॉक्टर विभूते सर तसेच आमचेच वर्गमित्र चाटी सर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या बॅचचे इनामदार सर वकील प्रदीप बोचरे सुरेश जगदाळे सर कालिदास जिने सर व जाधव सर यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार सर व प्रदीप भोसले यांनी केले. शेवटी आभार जगदाळे सर यांनी मानले व शेवटी सर्वांनी जड अंतकरणाने निरोप घेतला.
✍️ प्राध्यापक धनंजय पन्हाळकर, नेरले
ता. करमाळा, 9423303768