कंदर येथे मैत्री फाउंडेशनच्यावतीने साहित्य वाटप

कंदर / संदेश प्रतिनिधी संदीप कांबळे…
करमाळा : मैञी फाउंडेशनच्यावतीने कंदर (ता.करमाळा) येथे भारतीय स्वातंत्र्यचा 75 वा अमृतमहोत्सव निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व ग्रामपंचायत महिला सफाई कामगारांना साड्यांचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर व कण्वमुनी विद्यालय व जुनिअर कॉलेज कंदर येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप मैत्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मैत्री फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.कंदर ग्रामपंचायतचे सरपंच सौ. मनिषाताई भांगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सौ. साळुंखे,भास्करराव भांगे, सोलापूर जिल्हा रयतक्रांती संघटनेचे सरचिटणीस राजकुमार सरडे, निलेश भांगे, नाना फरतडे ,अनिल फरतडे, दत्तात्रय केदार ,अनिल सुरवसे, अण्णासाहेब कदम, डॉ. दादासाहेब माने ,संभाजी लोंढे,उद्योजक दिलावर शेख, बाळासाहेब जगताप ,भिवाजी बसळे,राजकुमार यादव, सतीश वाघमोडे, गणेश भांगे व मैत्री फाउंडेशनचे सर्व सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.