उत्तरेश्वर देवस्थानचा अनोखा उपक्रम – चक्क 2200 विद्यार्थ्यांना दिले जेवणाचे डबे - Saptahik Sandesh

उत्तरेश्वर देवस्थानचा अनोखा उपक्रम – चक्क 2200 विद्यार्थ्यांना दिले जेवणाचे डबे

Kem tiffin distribution function

केम/संजय जाधव
केम,ता.18
: केम (ता.करमाळा) येथील उत्तरेश्वर देवस्थान हे यांच्याकडून नेहमीच अनोखा राबवले जातात. यावर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केम मधील सर्व प्राथमिक व माध्यमिक (इयत्ता १ली ते १० वी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या भावनेतून जवळपास २,००,०००/-रूपये किंमतीचे २२०० टिफीन बाॅक्सचे वाटप करण्यात आले.

केम येथील उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रतिवर्षी काहीना काही उपक्रम राबवला जातो.यावर्षी अमृतमहोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्री उत्तरेश्वर विद्यालय, जि.प.प्राथमिक केंद्र शाळा, शा.गो. पवार विद्यालय, नुतन विद्यालय व स्व राजाभाऊ तळेकर विद्यालय व सर्व वस्ती शाळांमधील विद्यार्थ्यांना टिफीन बाॅक्सचे वाटप करण्यात आले याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन श्री दादासाहेब गोडसे व ज्येष्ठ विश्वस्त श्री अरुण वासकर तसेच केमचे ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर , उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त भाऊसाहेब बिचितकर, मनोजकुमार सोलापूरे,मोहन दोंड, विजय तळेकर, माजी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध आण्णा कांबळे, सरपंच आकाश भोसले याचे हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी ग्रा.पं सदस्य, राहुल आबा कोरे, महावीर आबा तळेकर तसेच विविध शाळांतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व बहुसंख्य ग्रामस्थ , युवावर्ग उपस्थित होता.

Yash collection karmala clothes shop

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!