पांडे येथे उद्या कमलाई केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन

करमाळा (दि.९) – करमाळा तालुक्यातील पांडे येथे गुरुवार, दि. १० एप्रिल रोजी कमलाई केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींचे आयोजन गोरखबापु कोळेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या शर्यतींना मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
या स्पर्धेसाठी लागणाऱ्या मैदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या शर्यती सकाळी ९ वाजता शुभमनगर (पांडे) येथील करमाळा-कुर्डूवाडी रोडवर सुरु होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
बक्षिसांची रचना पुढीलप्रमाणे –
- प्रथम क्रमांक – रु. ७१,०००
- द्वितीय क्रमांक – रु. ५१,०००
- तृतीय क्रमांक – रु. ३१,०००
- चतुर्थ क्रमांक – रु. २१,०००
- पाचवा क्रमांक – रु. ११,०००
- सहावा क्रमांक – रु. ७७७७
- सातवा क्रमांक – रु. ५५५५

या शर्यतींसाठी प्रवेश फी रु. ७०० असून नाव नोंदणीसाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत –
बाळासाहेब गोरे गुरुजी – ९६८९६६४९८४, गोरख कोळेकर – ९६८९२७१४२२, अक्षय आंधळकर – ८६०५५३६००१
गणेश मोरे – ९५२९१०२६२६
या भव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पै. जयराम सोरटे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





