जेऊर येथील बाजारतळात मुंबई मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांची कारवाई.. - Saptahik Sandesh

जेऊर येथील बाजारतळात मुंबई मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांची कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील बाजारतळ मध्ये मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहीदास जगन्नाथ शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, पोलीस निरीक्षक श्री गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसेच माझे सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल श्री बागल असे जेऊर दूर क्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत होतो.

असताना आम्हाला माहिती दाराकडून माहिती मिळाली की बाबासाहेब उघडे हे मुंबई मटका नावाचा जुगार चालवतात, त्यामुळे तातडीने आम्ही जेऊर (ता.करमाळा) येथील बाजार तळावर जाऊन तेथील शॉपिंग सेंटर समोर आडोशालाखाली मान घालून कागदावर काहीतरी लिहीत असलेला एक व्यक्ती दिसला, त्याला तिथे जाऊन पकडून त्याचे नाव विचारले असता मनोज छगन झोळे (वय 40) रा. सुतारगल्ली, करमाळा (ता.करमाळा) असे सांगितले.

त्यावेळेस त्याची अंग झडती घेतले असता त्याच्याकडे एक पांढऱ्या रंगाचा कागद एक पेन व काही पैसे आढळून आले त्यामध्ये 2710/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली, त्याला या संदर्भात विचारले असता , त्याने मटक्याचे मालक बाबासाहेब उघडे रा.वांगी नं 1 ता.करमाळा हे आहेत. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

कटयावर आडोशाला खाली मान घालुन मांडीवरती कागदावर काहीतरी लिहत असल्याचे दिसला त्याचा आम्हाला बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यास जागीच गराडा घालुन पकडले ती वेळ 18:30 वा ची होती. पकडलेल्या इसमास पंचा समक्ष नाव व पत्ता विचारलेस त्याने आपले नाव मनोज छगन झोळे वय 40वर्ष रा. सुतारगल्ली, करमाळा ता. करमाळा जि. सोलापुर असे असल्याचे सांगीतले. त्याचे अंगझडतीचा उददेश कळवुन त्याची अंगझडती पंचा समक्ष घेतली असता त्याचे डावे हातात एक पांढरे रंगाचा कागद व उजवे हातात पेन होता व बसलेल्या ठिकाणी पैसे होते त्याचे हातातील कागद पाहता एक पांढरे रंगाचा कागद त्यात वरील बाजुस बॉलपेनने दि. 18/11मुंबई असे लिहलेले त्याखाली आकडे लिहुन त्याचे समोर अंकात पैसे लिहलेले मिळुन आले तो बसलेल्या ठिकाणी असलेले पैसे पंचासमक्ष मोजले असता 2710 रू रोख रक्कम त्यात 100, 50, 20, 10 रू च्या भारतीय चलनी नोटा असे एकुण बॉलपेन सह 2710 रू चे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मिळुन आल्याने ते पंचासमक्ष सपोनि/सचिन जगताप यांनी जप्त करून त्यावर पंचाचे व पोलीसांचे सहयाचे चौकशी केली असता त्याने सदर मटका हा सदर

कागदी लेबल लावुन जप्त केले आहे. सदर इसमांकडे अधिक मटक्याचे मालक बाबासाहेब उघडे रा. वांगी नं 1 ता. करमाळा जि. सोलापुर याचेसाठी घेतलेला असुन तो त्याचेकडे .

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!