बेकायदेशिरपणे रस्त्यावर दारूविक्री करीत असलेल्या महिलेवर करमाळा पोलिसांची कारवाई - Saptahik Sandesh

बेकायदेशिरपणे रस्त्यावर दारूविक्री करीत असलेल्या महिलेवर करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : वडशिवणे ते केम रोडलगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला हातभट्टी दारूची बेकायदेशिरपणे विक्री करीत असलेल्या महिलेवर करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर ला घडला आहे. 

याप्रकरणी पो.काँ सुरज गजेद्र रामगुडे  यांनी करमाळा पोलीस ठाणेत फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली मी व सोबत पो.उपनि जमदाडे,  पो.हे.काँ श्री.शिंदे, पो.काँ. श्री.वाघमारे, पो.काँ श्री. देवकते, पो.काँ श्री. माने, पो.ना.पल्लवी इंगळे असे सर्व केम दुरक्षेत्र हद्दीमध्ये अवैद्य धंदयावर कारवाई करणेकामी सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की,  वडशिवणे (ता.करमाळा) येथिल पनाळकर वस्ती येथे एक महिला नामे वर्षा काळे (रा.वडशिवणे ता.करमाळा) हि वडशिवणे ते केम जाणारे रोडलगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला हातभट्टी दारूची बेकायदेशिरपणे विक्री करीत आहे.

अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने तातडीने पोलीस स्टाफ़ पायी चालत सदर ठिकाणाजवळ गेलो असता तेथे एक महिला तिचे समोर दोन प्लॅस्टिकचे कॅन्ड घेवून बसलेली दिसली. तिला जागीच पकडणार परंतु तीला आमचा संशय आल्याने ती जागीच दोन्ही प्लॅस्टीकचे कँन्ड जागीच सोडुन अंधाराचा फायदा घेवुन ती पळुन गेली तिच्या नावाची व पत्याची चौकशी केली असता वर्षा काळे रा.वडशिवणे ता.करमाळा असे आसल्याचे समजले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!