केम येथे मशाल रॅलीचे आयोजन
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : स्वातंत्र्य च्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व ऊत्तरेश्वर रक्त दाते संघटना यांच्या वतीने मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हि रॅलीची सुरूवात श्री उत्तरेश्वर मंदिराच्या भव्य पटांगणावरून सुरूवात झाली या रॅलीचे उद्घाघाटन जि,प,अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले या रॅलीत चर्मकार समाजातील सर्व बांधव मशाली घेऊन सहभागी झाले होते सर्वांच्या हातात तिंरगी झेंडे होते या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीत स्वराज्य रक्षक टिम सहभागी झाली होती या टिमचे संस्थापक अक्षय तळेकर यांच्या टिमने स्वराज्याचे खेळाचे थरारक प्रात्यक्षिक करून दाखविली या मध्ये तलवार चालविणे दांड पटा् लाटि,काटि,चक्र फिरवणे असी प्रात्यक्षिक करून दाखविले हा खेळ पाहण्यासाठी रात्री बारा वाजता नागरिकानी गर्दी केली होती या रॅलीत वंदे मातरम् भारत माता कि जय ,जय जवान जय किसान अस्या घोषणा दिल्या जात होत्या या घोषणानी संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती.
या रॅलीत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, विश्वस्त मनोज सोलापूरे,विजय बप्पा तळेकर, मोहन दौड, भाऊसाहेब बिचीतकर, सरपंच आकाश भोसले, सदस्य राहुल कोरे, बाळासाहेब साखरे, खंडू शेट वासकर, गणेश गुरव तात्या गुरव केदार पळसकर, चंद्र कांत तळेकर, श्री राम गलांडे, भैरु शिंदे दत्तात्रय कुलकर्णी, राजेंद्र दौड, शुभम कंदरकर, तुषार शिंदे, बाळू ननवरे, सचिन ओहोळ, संजय वाघमारे ऊत्तरेश्वर कांबळे राजेंद्र कांबळे, व सर्व तरुण मंडळी होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंदवे गुरूजी यानी केले.रॅलीची सांगता झाल्यावर आभार संजय वाघमारे गुरूजी यानी मानले