बारावी परीक्षेत नमीरा फकीर तालुक्यात प्रथम - Saptahik Sandesh

बारावी परीक्षेत नमीरा फकीर तालुक्यात प्रथम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी या वर्षी देखील तालुक्यात इ . १२ वी बोर्ड परीक्षेत निकालात सर्वाधिक ३२२ विद्यार्थी पैकी तब्बल ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९९ . ६८ % निकाल लागला आहे. कुमारी नमिरा इनुस फकीर हीने ९२ .१७% गुण मिळवत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

तसेच या परीक्षेत कु साक्षी गणेश देशमाने हीने ८९.६७ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला असून कु . तन्वी रविंद्र अडसूळ या विद्यार्थीनीने ८८ .५० % मार्क्स मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे . एकुण ३२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी विशेष प्राविण्याह प्रथम श्रेणीत , १८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , ९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ०२विद्यार्थी उत्तीण श्रेणी मिळवत पास झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ जयवंतराव जगताप , विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप , विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, प्राचार्य पी ए .कापले , उपप्राचार्य अनिस बागवान , पर्यवेक्षक पाटील बी .के , पर्यवेक्षिका सौ .सुनिता नवले ,विज्ञान शाखा विभाग प्रमुख पवार व्ही एल .यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!