प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला जाणार सन्मान
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/img-20240521-wa00043645494662629589597-1024x1024.jpg)
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान, रावगाव (ता.करमाळा) या सामाजिक संस्थेच्या वतीने १० वी १२ वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा करमाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी दिली आहे. ज्या विद्यार्थ्याला ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी/पालकांनी 9359129373 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240520-WA0020-1024x1024.jpg)
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240519-WA0009.jpg)