१२ वीच्या परीक्षेत दत्तकला ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल
केम (संजय जाधव) : दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा यावर्षीचा निकाल १००% टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली.
सन 2024 मध्ये विज्ञान व कॉमर्स विभागात 246 विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास करताना विद्यालयांमध्ये मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्या जात होत्या. शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे ज्यादा तास घेऊन त्यांच्या गुणवत्ता मध्ये सुधार करण्याचा प्रयत्न येथील शिक्षकांनी केला अशी माहिती प्राचार्य सौ सिंधु यादव यांनी दिली
विज्ञान विभागामध्ये ओजस महावीर शहा 90.33% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाला. वैष्णवी मोहनराव लाड ही विद्यार्थ्यांनी 88.33% मिळून द्वितीय आली. संतोष शिवलाल जाधव हा विद्यार्थी 88.33% गुण मिळवून तिसरा आला. समीक्षा पंकज गादिया ही विद्यार्थिनी 87.33 गुण मिळवून पास झाली.
कॉमर्स विभागात झील आशिष दोषी ही विद्यार्थिनी 84.67 गुणांनी कॉमर्स विभागात प्रथम आली. रोहित गोरख कांबळे हा विद्यार्थी 84.00 द्वितीय आला. प्रवीण गणाराम चौधरी हा विद्यार्थी 83.67 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाची उत्तीर्ण झाला. वरील सर्व विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, संस्थेचे सीईओ डॉ विशाल बाबर, स्कूल विभागाच्या डायरेक्टर सौ नंदा ताटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आता या सर्व विशेष विद्यार्थ्यांना प्राचार्य शिक्षकांचे मार्गदर्शन भेटले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलच्या प्राचार्य सौ सिंधु यादव् व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.