रेल्वे थांबा मिळवून दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांचा केम येथे सत्कार आयोजित

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील खूप दिवसाची प्रलंबित एक्स्प्रेस रेल्वेला थांबा मिळावा ही मागणी अखेर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांच्या पूर्ण झाली.

मुंबई-हैदराबाद व पंढरपूर-मुंबई एक्सप्रेस गाड्यांना केम येथे थांबा मिळाला असून ७ तारखेपासून या गाड्यांचा थांबा सुरू होणार आहे. याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांचा केम ग्रामस्थांच्या वतीने येत्या ७ जानेवारी रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी आज केम येथे येऊन स्वतःपाहणी केली. तसेच केम रेल्वे स्टेशनला देखील भेट दिली. यावेळी केम शहर भाजपाचे अध्यक्ष गणेश आबा तळेकर, सरचिटणीस धनंजय ताकमोगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, राहुल रामदासी, विकास कळसाईत दत्ता भाऊ तळेकर सागर नागटिळक, हर्षवर्धन गाडे आदि उपस्थित होते.
Related News : केम येथे ‘पंढरपूर एक्सप्रेस’ व ‘मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस’ ला खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे थांबा मिळाला : गणेश चिवटे
Related News : केम स्टेशनवर थांबा मंजूर झालेल्या २ एक्स्प्रेसचे वेळापत्रक झाले जाहीर