केम येथे 'पंढरपूर एक्सप्रेस' व 'मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस' ला खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे थांबा मिळाला : गणेश चिवटे - Saptahik Sandesh

केम येथे ‘पंढरपूर एक्सप्रेस’ व ‘मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस’ ला खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे थांबा मिळाला : गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील केम हे कुंकवासाठी जगप्रसिद्ध आहे , येथील व्यापाऱ्यांची केम येथे पंढरपूर एक्सप्रेस (22731/32) व मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस (11027/28) रेल्वे गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी वारंवार होत होती, या मागणीचा पाठपुरावा माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केमला थांबा मिळवून दिला आहे. अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली.

केम येथे थांबा मिळवण्यासाठी वारंवार सूचना करूनही रेल्वे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रेल्वेला थांबा मिळत नव्हता प्रसंगी खासदार निंबाळकर यांना रेल्वे सदस्यत्वाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता, परंतु केम येथील व्यापारी रेल्वे प्रवासी व करमाळ्यातील नागरिकांच्या सोयीसाठी वारंवार पाठपुरावा करून त्यांनी थांबा मिळवलाच अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.

यासाठी केम रेल्वे प्रवासी संघटनेने देखील वेळोवेळी पाठपुरावा करून बरेचदा पत्र
व्यवहार केला होता, त्याचबरोबर गावातील व्यापारी वर्गाने देखील यासाठी खुप मेहनत घेतली. खासदार साहेबांच्या जनता दरबार मध्ये गावातील नागरिकांनी रेल्वे थांब्याचा विषय खुप लावून धरला होता. त्यामुळे याचे श्रेय देखील तितकेच केम ग्रामस्थांना जाते.
केमला थांबा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.केमला दोन गाड्यांचा थांबा मिळवून दिल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे व गणेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!