करमाळा आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी नलवडे तर सचिवपदी कांबळे यांची निवड - Saptahik Sandesh

करमाळा आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी नलवडे तर सचिवपदी कांबळे यांची निवड

करमाळा (दि.२५) – करमाळा आगार एसटी कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुने रेस्ट हाऊस येथे पार पडली. या सभेचे अध्यक्ष स्थान संघटनेचे प्रादेशिक सचिव व विभागीय सचिव प्रशांत गायकवाड हे होते. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी नानासाहेब नलवडे तर सचिव पदी प्रवीण कांबळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्ष नलवडे बोलताना म्हणाले की कर्मचाऱ्यांनी एकमताने माझी निवड केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचा आभारी आहे. भविष्यात कामगार हितासाठी झटणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.नूतन सचिव कांबळे बोलताना म्हणाले की आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी सोडवून सचिव पदाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे श्री कांबळे यांनी म्हटले.

यावेळी संघटनेचे प्रादेशिक सचिव व विभागीय सचिव प्रशांत गायकवाड, विभागीय खजिनदार तानाजी सावंत, विभागीय उपाध्यक्ष पंडितराव ताकमोगे, ज्येष्ठ नेते हनुमंत बिनवडे, जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे, प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे, नारायण रेगुडे, सचिन माने, गणेश भिसे, संतोष भिसे, संतोष उदमले, मोहन हांडे, विजय पाटील, दयानंद जाधवर, बाळू देवकर, महादेव कांबळे, मारुती जगताप ,शहाजी घाडगे, रामभाऊ ढेरे ,आधी सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!