स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून मतीमंद विद्यार्थांना मिठाई व ब्लँकेट वाटप

केम (संजय जाधव) – शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा ९८ व्या जयंतीनिमित्त केम (ता.करमाळा) येथील नागनाथ मतीमंद निवासी विद्यालयातील मतीमंद विद्यार्थांना गोड मिष्ठानाचे भोजन व थंडी पासुन बचाव होण्यासाठी उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, माजी उपतालुकाप्रमुख उत्तरेश्वर तळेकर, , शहरप्रमुख सतीश खानट आवीनाश तळेकर , नवनाथ देवकर,दयानंद तळेकर, दत्ता कांरडे, कृष्णा तळेकर,अनिल तळेकर, तरकसे आदि उपस्थित होते
या वेळी बोलताना उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर यांनी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण हे पक्षाचे धोरण आहे त्यानुसार आम्ही आज मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ व थंडी पासून बचाव करण्यासाठी रजयी वाटप केल्या या वेळी जोध मॅडम यानी आपले मनोगत व्यक्त केले त्यानी ऊबाठा गटाच्या उपक्रमांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार नलवडे सर यांनी मानलें या वेळी या प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

