पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार

करमाळा(दि.९) : पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्यावतीने करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार व सन्मान करमाळा येथे करण्यात आला.
या कार्यक्रमास करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड अजित विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अॅड अजित विघ्ने, सोलापूर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार यांनी करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या पत्रकारितेचे कौतुक करून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये पत्रकार सुहास घोलप यांनी पत्रकारांच्या संघर्षमय जीवनाचे खरे वास्तव आपल्या मनोगतांमध्ये व्यक्त करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या पत्रकारांना समाजाने राजकर्त्यांनी व शासनाने पाठबळ देऊन सहकार्य करून न्याय देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकादिनानिमित्त पत्रकार आशपाक सय्यद सुहास घोलप, आण्णा काळे, अशोक नरसाळे, दिनेश मडके डी. जी पाखरे, जयंत दळवी सचिन जव्हेरी, सचिन हिरडे, शितलकुमार मोटे, विशाल घोलप, शंभुराजे फरतडे, हर्षवर्धन गाडे, सिद्धार्थ वाघमारे,सुनील भोसले, विशाल परदेशी, सूर्यकांत होनप,
तुषार जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शाल पेन डायरी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बांधव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे मत भरत अवताडे यांनी व्यक्त केले.




