भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर

करमाळा (दि.१०) : भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली. ही निवड भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर भाजप जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांच्या हस्ते पत्र देवुन घोषणा करण्यात आली.
रामभाऊ सातपुते यांनी ताकतीने काम करा भाजप तुमच्या सोबत आहे असे प्रतिपादन केले. भाजपामहिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी फोनवरून अभिनंदन केले.
शुभम बंडगर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत असताना विद्यार्थी प्रश्नांवर ते आवर्जून आवाज उठवणे तसेच विविध सामाजिक विषयांवरती यांनी काम केले आहे. ते बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांचे चिरंजीव आहेत.



