प्रबोधनकार ठाकरे यांच्या जंयती निमित्त संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने सर्व सेमी इंग्रजीची पुस्तके वाटप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सांगवी नं 2 (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मराठा सेवा संघ 32 वा वर्धापण दिनानिमित्त व प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जंयती निमित्त संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने सर्व सेमी इंग्रजीची पुस्तके वाटप करण्यात आली. करमाळा तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे, ती सर्व सेमी इंग्रजी झाली आहे.

याप्रसंगी करमाळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, सौ.राऊत, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, सरपंच शोभा आजिनाथ बनसोडे, संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष सुहास पोळ, शहराध्यक्ष अतुल निर्मळ रोहिदास दौंड, सुहास शिंदे, वैभव तळे (उपसरपंच) शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब निंबाळकर उपाध्यक्ष तुळशिदास शिंदे उपस्थित होते.

तसेच पांडुरंग तळे ग्रा.प.सदस्य, दिनकर तळे ग्र.प.सदस्य अजित तळे शा.व्यवस्थापन समिती सदस्य काकासाहेब निंबाळकर , प्रगतशील बागायतदार रामेश्वर कोरे , चंद्रकांत गवळी , सुहास नागटिळक, अजित कांबळे शिक्षक , शंकर लोणकर (मुख्याध्यापक) ईत्यादी तसेच तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी केलेल्या आव्हानांना प्रतिसाद देवून संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने शाळेला सेमी इंग्रजी ची पुस्तके भेट दिली.

प्रत्येक वर्षी शाळा, आश्रमशाळा, गोरगरीब व अनाथ लोकांना महापुरुषांच्या जयंती निमित्त मुलांना गणवेश, वह्या-पुस्तके, महापुरुषांचे फोटो , कोविड काळामध्ये गरीब लोकांना किराणा वाटप अनाथांना कपडे, खाऊवाटप, इत्यादी सामाजिक उपक्रम संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने प्रत्येक वर्षी राबवले जातात आभार काकासाहेब निंबाळकर यांनी मांडले.

On the occasion of Prabodhankar Thackeray’s birth anniversary, Sambhaji Brigade distributed all semi English books

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!