जमिनीच्या कारणावरून दांम्पत्याकडून एकास मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तु जमिनीत यायचे नाही.. या कारणावरून दांम्पत्याने एकास लाकडी काठीने मारहाण केली आहे. हा प्रकार २३ मे २०२४ ला दुपारी तीन वाजता सातोली येथे घडला आहे. या प्रकरणी मुकूंद रामचंद्र फरतडे (रा. सातोली) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की २३ मे रोजी दुपारी तीन वाजता मी माझ्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बसलो असता तु शेतात यायचे नाही; असे म्हणून उज्वला ज्ञानदेव फरतडे व ज्ञानदेव तुकाराम फरतडे या दोघांनी काठीने व विळ्याने मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.