आळजापूर येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून तीन लाख रूपयाची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आळजापूर (ता. करमाळा) येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून घरात घुसून लोखंडी कपाट तोडून २ लाख ९२ हजार ५०० रूपयाचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. हा प्रकार २३ मे ला गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी जालिंदर दगडू रोडे (रा. आळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २३ मे ला आम्ही शेतातील कामात असताना सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून गेलो होतो. त्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर उघडून त्यातील दोन गंठन, दोन नेकलेस, दोन झुबे व दोन साखळ्या असा साधारणत: साडेसहा तोळे सोन्याचे दागिणे रक्कम रू. २ लाख ९२ हजार ५०० रू. चा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


