उद्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन - जास्तीत जास्त खटले मिटवावेत : न्यायाधीश सौ.मिना एखे - Saptahik Sandesh

उद्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन – जास्तीत जास्त खटले मिटवावेत : न्यायाधीश सौ.मिना एखे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा,ता.4 : करमाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व करमाळा वकीलसंघ यांच्या संयुक्तविद्यमाने उद्या शनिवारी (ता.१३) राष्ट्रीय लोकअदालतचे करमाळा न्यायालयात आयोजन करण्यात आले आहे,  यामध्ये जास्तीत जास्त खटले मिटवावेत व नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा व करमाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ.मिना प्र.एखे सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोकअदालतबाबत पुढे बोलताना श्रीम.एखे यांनी म्हटले की, उद्या होणाऱ्या लोकअदालत करमाळा तालुक्यातील फौजदारी तडजोडपात्र, बँक वसुली, कलम १३८ एनआय ॲक्ट, अपघात न्यायाधिकरण, कामगार वाद, वीज, पाणी देयक, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त यामधील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांवर तडजोडीने वाद मिटविण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले वाद यामध्ये निकाली करून घ्यावेत तसेच लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी वकीलांनी सहकार्य करावे. असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!