करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अटी शिथिल कराव्यात - प्रा. रामदास झोळ - Saptahik Sandesh

करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अटी शिथिल कराव्यात – प्रा. रामदास झोळ



केम(संजय जाधव) : करमाळा अर्बन सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. संचालक पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२५ आहे. मात्र, २०२२ पासून रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बँकेने ठरवलेली पात्रता अशी आहे :

१) अर्जदाराकडे बँकेचे किमान ५००० रुपये शेअर्स असणे आवश्यक आहे.
२) अर्जदाराच्या नावे बँकेत किमान २५,००० रुपये ठेव असणे बंधनकारक आहे.

मात्र बँकेचे व्यवहार बंद असल्याने ही रक्कम भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सदर अटी रद्द कराव्यात किंवा त्यावर पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती प्रा. रामदास झोळ यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे कवडे,, डी. डी. आर. सोलापूरचे गायकवाड साहेब, बँकेचे प्रशासक डोके,, निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. शिंदे आणि सहकार मंत्र्यांचे सचिव जाधव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली आहे. उद्या या विषयावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे, अन्यथा कायदेशीर मार्गाने न्याय मागावा लागेल, असे प्रा. झोळ यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!