प्रा.रमेश पाटील यांना पीएच्.डी.पदवी प्रदान
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील भारत महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.रमेश पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाची पीएच्.डी पदवी मिळाली आहे.
त्यांनी “मंजू कपूर व कमला मार्कंडया यांच्या निवडक कादंबरीमध्ये स्त्रियांवर होणारा अन्याय व त्यांचे एकाकीपण यांचा तौलनिक अभ्यास ” या विषयावरती संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना आदर्श महाविद्यालय उमरगा येथील प्रा.डॉ.प्रशांत मोठे यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर या संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सचिव प्रा.अर्जुन सरक, प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे,सर्व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.