ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा महेश निकत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत… - Saptahik Sandesh

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा महेश निकत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय super 30 गुणवंत शिक्षक पुरस्कार मध्ये महेश निकत यांची निवड करण्यात आली, त्यानिमित्त रविवारी 4 सप्टेंबर रोजी मेडिकोज गील्टस् भिकोजी तांबे सभागृह बारामती येथे त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ.एच. आर. भापकर M.sc SET Ph.D (Maths) प्रसिद्ध सशोधक व गणित तज्ञ , डॉ. नीरजकुमार शहा B.E.Civil M.Tech Gold medalists आत्मिक एज्युकेशन पुणे आणि केशवराव आनंदराव शितोळे , संस्थापक उत्कर्ष ग्राम शिक्षण संस्था कुरकुंभ व इतर सर्व सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

शब्दधन सोशल फाउंडेशन ही संस्था निती आयोग या भारत सरकारच्या संस्थेत नोंदणीकृत भारत सरकार सूक्ष्म , लघु एव मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत संस्था आहे, हा सन्मान मला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणा देईल असे महेश निकत यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!