रमजान ईद ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर होणार : कलीम काझी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : रमजान ईद ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजता होणार आहे, अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी यांनी सांगितले. यावेळी शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच समाज बांधवांनी ईद ची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात भक्तीमय भावनेने भारतातील एकता व अखंडता आणि बंधुभाव टिकण्यासाठी अल्लाह चरणी प्रार्थना करावी एकमेकांबद्दल असणारा व्देष , मत्सर कटुता आणि स्वैराचार दुर करण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी मनापासून प्रयत्न करावे.
३० मार्च रोजी असलेल्या हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने समस्त हिंदू बांधवांना शुभेच्छा देत आहोत सर्वांना नवीन वर्ष हे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो यंदा पाऊस पाणी भरपूर पडुन अन्न धान्याने, शेती मालाला भाव मिळुन बळी राजाला सुखा चे दिवस यावे.
रमजान ईद च्या दिवशी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना आपल्या घरी बोलावून शिरखुर्मा चा आस्वाद देऊन आम्ही एक आहे आणि एकच राहणार असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईद चा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले शहर काझी कलीम काझी सर यांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी समीर शेख, जमीर सय्यद , सुरज शेख, रमजान बेग, जहांगीर भाई बेग, मुसतकीम पठाण , इकबाल शेख, इमित्याज पठाण, उपस्थित होते.





