केम येथे शनि अमावस्यानिमित्त आयोजित करण्यात आला कीर्तन महोत्सव

केम (संजय जाधव): शनि अमावस्यानिमित्त केम येथे २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होते. शिवशंभो वेशीजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हा कीर्तन महोत्सव पार पडला.

गुरुवारी २७ मार्चला सायंकाळी ७ ते ९ दरम्यान ह.भ.प.ऊरमुडे महाराज चौभें पिंपरी यांचे कीर्तन झाले. शुक्रवारी २८ मार्चला सायंकाळी ७ ते ९ दरम्यान ह.भ.प.स्वप्निल महाराज पाथूर्डी यांचे कीर्तन झाले. शनि अमावस्याचे कीर्तन शनिवारी २९ मार्चला सकाळी १० ते १२ दरम्यान ह.भ.प भुजंग तळेकर महाराज यांची कीर्तनसेवा पार पडली. १२ वा.५ मि. मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर हनुमानाची आरती होऊन सप्ताहाची सांगता झाली. यानंतर सचिन तळेकर यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात हा सप्ताहासाठी श्री उत्तरेश्वर रक्तदाते संघटना व हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला केम व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.





