दहावीच्या परीक्षेत तळेकर विद्यालयाचा ऋषीकेश तळेकर केम केंद्रात प्रथम
केम (संजय जाधव) – केम येथील महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ या संस्थेच्या राजाभाऊ तळेकर विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 97.50 टक्के लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रशालेचे प्रथम पाच यशस्वी विद्यार्थी –
- तळेकर ऋषिकेश नागनाथ :-95.80%
- कु.तळेकर पूर्वा शामकांत:-93.20%
- तळेकर पृथ्वीराज दत्तात्रय:-90.00%
- कु.तळेकर सिद्धी सचिन:-89.60%
- पळसकर सुरज महादेव :-85.40%
विद्यालयाच्या ऋषिकेश नागनाथ तळेकर याने 95.80 टक्के मिळवून केम केंद्रात व परिसरात प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नावलौकिक केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश तळेकर सर श्री शिवाजी प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर सर व राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज तळेकर सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.