कोंढेज येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री कृष्ण जन्म सोहळा संपन्न.. - Saptahik Sandesh

कोंढेज येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री कृष्ण जन्म सोहळा संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कोंढेज (ता.करमाळा) येथे आमदार नारायणआबा पाटील मित्र मंडळच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कृष्ण जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिवशी दिवसभर हरि विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले, रात्री ह.भ.प शरद आदलिंग महाराज कोंढेजकर यांचे श्री कृष्ण जन्म या विषयावर प्रवचन करण्यात आले, याप्रसंगी श्री कृष्ण प्रतिमेचे पूजन निवास महामुनी यांनी केले, त्यानंतर श्री कृष्ण प्रतिमेवर पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.शरद आदलिंग, श्रीकांत कपूर, सोनिराम महामुनी, चंद्रकांत सालसकर, ह.प.प बंगाळे काकू, विठ्ठल महिला मंडळ यांनी सहकार्य केले. तसेच याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे आमदार नारायणआबा पाटील मित्र मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले व महाप्रसाद देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!