कंदर येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात संपन्न

कंदर (संदीप कांबळे) : कंदर तालुका करमाळा येथे श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ व शिवलीला ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सहा ते सात अभिषेक सकाळी सात ते अकरा शिवलीला ग्रंथ पारायण सकाळी 11 ते 12 या वेळेस स्थानिक भाविकांचे प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत श्री शिव महापुराण कथा रात्री बारा ते पहाटे हारी जागर असे दैनंदिन कार्यक्रम झाले.

कथा प्रवक्ते रामायणाचार्य अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांनी शिव महापुराण कथा सांगितली. रविवार दिनांक 6 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प देविदास भोसले महाराज यांनी राम जन्माचे किर्तन सांगितले. सायंकाळी चार ते सहा तून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी राम लक्ष्मण सीता हनुमान रावण आदींचे सजीव देखावा सादर करण्यात आला. यामध्ये सजीव देखावा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

सदर कार्यक्रम आठवडाभर सुरू होता. सोमवार दिनांक सात रोजी नऊ ते 11 या वेळेत ह भ प अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांचे काल्याचे किर्तन होऊन कार्यक्रमाचे सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम नगर मंडळ च्या युवकांनी विशेष परिश्रम घेतले.. कार्यक्रमास कंदर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

