आळसुंदे येथील ४० आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्यावेत – गृहमंत्र्यांना निवेदन

करमाळा(दि.१०): नेरले तलाव उजनीच्या पाण्याने पिण्यासाठी भरावा या साठी आळसुंदे येथील रस्ता रोको आंदोलकावर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे नागरिकातून संतापाची लाट आहे तो गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस प्रमुख सोलापूर,गृहराज्यमंत्री मुंबई, गृहमंत्री तथा मुख्यमंत्री, यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती नेरले ग्रा.पं.माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून उजनी धरणाचे वाहून जाणारे पाणी नेरले तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील पाणी मिळत नसल्यामुळे दि-16/08/ 2024 रोजी पोलीस स्टेशन करमाळा,तहसील कार्यालय, दहिगाव योजना कार्यालय,यांना नेरले,आळसुंदे ग्रा.पं.ठरावासह दिनांक 23/08/ 2024 पर्यंत पाणी न सोडल्यास रस्ता रोको करण्याचे निवेदन दिले होते. त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले व आंदोलन स्थळी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कर्मचारी कांबळे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे ३० ते ३५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते कांबळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांच्या हस्ते व तालुक्यातील 200 ते 225 नागरिक पत्रकार परिसरातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य, चेअरमन अशा जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सव्वा दहा वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे अकरा वाजता स्थगित करण्यात आले. आंदोलन शांततेत पार पडले व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिकांसोबत चर्चा करून चहा घेऊन आंदोलन शांततेत झाले बद्दल सर्वांचे आभार मानून आंदोलन ठिकाणाहून करमाळा कडे गेले
पाच वाजता घुगे यांनी पोलीस कॉन्स्टेबल दळवी खोटा गुन्हा दाखल केला सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद वाक्य पोलीस खात्याचे आहे.ज्या पोलीस स्टेशनने आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला पोहोच दिली. तेच पोलीस एफ आय आर मध्ये म्हणतात, आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यामुळे आम्ही आळसुंदे फाट्याकडे गेलो असता सदर 40 लोक तिथे बसून आंदोलन करत होते.अशी खोटी फिर्याद दिली आहे हे पोलीस निरीक्षक व पोलीस खात्याला न शोभणारी गोष्ट आहे.

आम्ही लोकशाही मार्गाने पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन होतो. पिण्यासाठी पाणी मागणे हा गुन्हा होत असेल तर लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज सालसे आळसुंदे नेरले वरकुटे गावातील येथील पक्षी प्राणी पाण्या वाचून मरत आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावे लागत आहे त्यामुळे हा गुन्हा त्वरित मागे घेऊन पिण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी नेरले ग्रा.पं.माजीसरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुप चे संस्थापक श्री.औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.




