आदिनाथ कारखाना फक्त संजयमामा शिंदे हेच चालवू शकतात – सुभाष गुळवे

करमाळा(दि.९): आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो कारखान्याकडे हस्तांतरित करताना एम.डी .च्या माध्यमातून नारायण पाटील यांनी अडचणी आणल्या. दहशत करण्याचा प्रयत्न केला. आदिनाथ चे वाटोळे करायला फक्त नारायण पाटीलच जबाबदार आहेत. विरोधकांनी साखर कशी निघते हे आधी सांगावे. ह्यांना कारखान्याचे काही देणंघेण नाही आणि कळतही नाही. मामांना साखर कारखान्याचा प्रचंड अनुभव आहे, त्यामुळे आदिनाथ साखर कारखाना फक्त संजयमामा शिंदे हेच चालवू शकतात असे प्रतिपादन बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुभाष गुळवे यांनी केले.

बुधवारी 9 एप्रिल रोजी रात्री केम तालुका करमाळा येथे महायुती आदिनाथ बचाव पॅनेलची प्रचार सभा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती . यावेळी आयोजित सभेत सुभाष गुळवे बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे होते.
यावेळी वामनराव बदे, मारुती पारखे, राजेंद्र बारकुंड ,माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, माजी संचालक नवनाथ भांगे , नानासाहेब लोकरे , ॲड. जालिंदर बसळे, उदयसिंह देशमुख , उमेश इंगळे, वडशिवणे चे सरपंच विशाल जगदाळे,प्रहार संघटनेचे संदीप तळेकर, अच्युत तळेकर,गोरख पारखे, उपसरपंच सागर कुर्डे, सुहास साळुंखे, आण्णासाहेब पवार, तात्या सरडे, धनंजय मोरे, दादासाहेब पारखे,सचिन काळे, योगेश ओहोळ,नितीन तळेकर, बापू पारखे, अमर भांगे, सातोली उपसरपंच भास्कर खुपसे, दत्तात्रय बिचितकर, जोतीराम बिचितकर रवींद्र वळेकर, उमेदवार चंद्रकांत सरडे,प्रशांत पाटील ,प्रमोद बदे , विलास जगदाळे , नागनाथ चिवटे ,नवनाथ जगदाळे , दशरथ पाटील , नितीन राजेभोसले , बबन जाधव , सोमनाथ देशमुख , सोमनाथ रोकडे ,अभिजीत पाटील , आशिष गायकवाड ,विनय ननवरे , सुजित बागल ,बाळकृष्ण सोनवणे , मंदा सरडे , शालन गुंडगिरे , रोहिदास सातव ,अनिल केकान उपस्थित होते.

प्रास्ताविक गोरख पारखे यांनी केले तर प्रहार संघटनेचे संदीप तळेकर , अच्युत तळेकर, उदय देशमुख , ॲड. जालिंदर बसळे, अरुण लोंढे, राजेंद्र बाबर, ॲड .अजित विघ्ने, राजेंद्र बारकुंड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोरख पारखे यांनी केले.




