पांगरे येथील तलाव भरला - ग्रामस्थांनी केले पाणीपूजन.. - Saptahik Sandesh

पांगरे येथील तलाव भरला – ग्रामस्थांनी केले पाणीपूजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पांगरे (ता.करमाळा) येथील नुकत्याच झालेल्या पावसामुळे भरला असून ओव्हर फ्लो पाणी सांडवामधून निघालेले आहे, त्यामुळे येथील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले असून ग्रामस्थांनी जल पूजन केले.

याप्रसंगी तालुका प्रहार धरणग्रस्त संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश शेळके यांचे हस्ते जल पूजन करण्यात आले. याप्रसंगी ओंकार कुलकर्णी, पांगरे गावचे सरपंच प्रतिनिधी व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय सोनवणे, पांगरे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सचिन पिसाळ, पांगरे ग्रामपंचायत चे सदस्य पैलवान महेश टेकाळे, विवेक पाटिल, भैरवनाथ हराळे, भैरवनाथ पवार, ज्ञानदेव दोंड, सुजितकुमार दोंड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जोतीराम गाडे-पाटिल, ज्ञानेश्वर गुटाळ, अरुण शेंडगे, तानाजीराव टेकाळे, बालाजी दोंड, पिंटू पाटिल, दिपक पाटिल किसन दोंड, नेताजी पाटिल, रघुनाथ दोंड, धनाजी पाटिल, सोनू पाटिल तसेच बहुसंख्य शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

The lake at Pangare was filled – Villagers performed water worship | Karmala News | Saptahik Sandesh| Digital sandesh| Pangre Talav

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!