उजनी धरण ८३ पार – शतकाकडे वाटचाल
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गेले अनेक दिवस धरण परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास भरल्यामुळे होणार विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायींनी असलेल्या उजनी धरणाने आपली पाणीपातळी +८३ टक्के पार केली असून धरणाची शंभरी कडे वाटचाल सुरू झालेली आहे. आज ४ ऑगस्ट, सकाळी ६ वा च्या पाणी पातळी विषयी मिळालेल्या माहिती नुसार उजनीत १०८.६३ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे. उजनी धरणात सध्या ७७ हजार १२९ क्युसेक्स ने दौंड मधून पाणी जमा होत आहे. पाणी पातळी ४९६.०८० मी. इतकी आहे. सध्या धरण +८३.८२ टक्के भरले आहे.
उजनी धरण लवकरच 100% पेक्षा जास्त भरले जाणार असून वर्षभर या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी अपेक्षा लोकांनी केली आहे.
उजनी धरणाची क्षमता
उजनी धरण 100 टक्के भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा जमा होतो, तर 111 टक्के भरल्यानंतर 123 टीएमसी पाणीसाठा जमा होतो. 63.65 टीएमसी मृत साठ्यात धरले जाते, तर 53.34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला जातो.