किरकोळ कारणावरून पिता-पुत्राकडून महिलेस मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : तु आम्हाला शिवीगाळ का केली .. असे म्हणून पिता-पुत्राने एका महिलेस गजाने व काठीने बेदम मारहाण करून हात फॅक्चर केला आहे. हा प्रकार ५ जुनला सायंकाळी पाच वाजता वडशिवणे (ता. करमाळा) येथे घडला आहे.
या प्रकरणी उषा मारूती उघडे (वय – ५४, रा. वडशिवणे) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की ५ जुनला सायंकाळी पाच वाजता मी माझ्या घरासमोर बसले असता, निळू लोंढे व त्याचा मुलगा करण लोंढे हे दोघे आले व तु आम्हाला शिवीगाळ का केली.. असे विचारले. त्यावेळी मी तुम्हाला शिवीगाळ केली नाही असे म्हटले असतानाही निळू लोंढे याने गजाने मारहाण केली तर करणने पडलेल्या काठीने मारहाण केली.
सदरचे भांडण सोडविण्यासाठी माझी भाची दिव्या उघडे व भावजय मीना उघडे या दोघी सोडविण्यासाठी आले असताना त्यांनाही या दोघींना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.