सकल धनगर समाज व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.. - Saptahik Sandesh

सकल धनगर समाज व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सकल धनगर समाज व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९९वी जयंती करमाळा कुटीर रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप व गो शाळेतील भाकड जनावरास चारा वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगताप गटाचे नेते,बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, डॉ.श्रीराम परदेशी, स्री.रोग तज्ञ डॉ. निलेश मोटे, डॉ. अशोक शेळके, डॉ. हेमंत पांढरे, डॉ. राम बिनवडे, डॉ. सुनील आडसुळ, डॉ.अभंग, डॉ.अमोल डूकरे, भाजपा कि.मो.जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, भाजपा शहर सरचिटणीस जितेश कटारिया,रा.काँ कोषाध्यक्ष अरुण टांगडे,सौरभ शिंगाडे, भाजपा जि.सचिव श्याम सिंधी,भारिप नेते शहाजी ठोसर इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शंभुराजे जगताप, डॉ.निलेश मोटे, डॉ.गुंजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गोशाळा पांजरपोळ या ठिकाणी भाकड जनावरासाठी ओला चारा वाटून गो मातेच्या ठिकाणी जाऊन अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उबाटाचे जिल्हा उपप्रमुख शाहूदादा फरतडे, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजभाऊ कदम, जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय अर्जुन गाडे,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, अमरजित साळुंखे,स्वा.शे.सं.अध्यक्ष अमोल घुमरे, वंचित यु.जिल्हाध्यक्ष साहेबा वाघमारे, प्रितम दोशी,यूवराज दोशी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

भाकड गो शाळेतील गाईस चारा वाटून मातेची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे स्वागत व सन्मान धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, इंजि.आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, रासप तालुका अध्यक्ष जिवन होगले,इंजि प्रविण होगले,इंजि.हर्षल कोळेकर,संपर्क प्रमुख विकास मेरगळ यांनी केले.

यावेळी शाहू दादा फरतडे, राजाभाऊ कदम,अमर साळुंखे,अर्जुन गाडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पप्पू मारकड, बंडू कुराडे,अविनाश मारकड, सोमनाथ मल्लाव, गणेश मारकड,भागवत वाघमोडे, विठ्ठल खांडेकर,नवनाथ वाघमोडे, देविदास कांबळे यांनी गो मातेस चारा वाटप व रुग्णांना फळे वाटपच्या कार्यक्रमास परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!