श्री क्षेत्र अंजनडोह येथे कार्तिक स्नान व काकडा आरती सोहळ्याची पंढरपुरात भक्तिमय सांगता.

करमाळा,संदेश प्रतिनिधी
श्री क्षेत्र अंजनडोह येथे श्री धर्मादेवी तुकाईदेवी यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. दिलीप महाराज मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्तिक स्नान व काकडा आरती सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे झाली.
दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. या काळात दररोज पहाटे काकडा आरती, कार्तिक स्नान, भजन आणि हरिनामाच्या गजरातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भजन व भक्तिसेवेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील परंपरा आणि आध्यात्मिक विचारांचा जागर करण्यात आला.

या सोहळ्याचा समारोप श्री क्षेत्र पंढरपूर येथे करण्यात आला. सांगता समारंभानिमित्त वै. राधाबाई मारुती जाधव यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ श्री. सोमनाथ मारुती जाधव यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या धार्मिक सोहळ्यात सुंदरदास पठाडे, संजय गावडे, दादा शिरस्कर, अजिनाथ माने, ईश्वर माने, विठ्ठल वीर, नवनाथ जाधव, तुकाराम जाधव, दत्तात्रय मेढे, दत्तात्रय माने, रघुनाथ यादव, धर्मराज शिंदे, वसंत दुर्गुडे, शामभाऊ रणदिवे, सुभाष रणदिवे तसेच अंजनडोह येथील समस्त महिला भजनी मंडळाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
