बिटरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.पाटील तर उपसरपंचपदी श्री.नलवडे यांची निवड... - Saptahik Sandesh

बिटरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.पाटील तर उपसरपंचपदी श्री.नलवडे यांची निवड…

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : बिटरगाव वांगी (ता.करमाळा) ग्रामपंचायतचीच्या सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक अत्यंत चुरशीने संपन्न झाली. यामध्ये श्री संत रघुराज महाराज व जय भवानी ग्रामविकास पॅनल च्या उमेदवार सौ.हेमलता विश्वास पाटील यांच्या विरोधात सौ अमृता सचिन नलवडे यांच्यामध्ये सरपंच पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये हेमलता विश्वास पाटील यांना पाच मते मिळाले व अमृता सचिन नलावडे यांना चार मत मिळाली.

हेमलता विश्वास पाटील यांची सरपंच पदी निवड झाली. तसेच व उपसरपंच पदासाठी आबासाहेब नरसिंग नलवडे व शिवाजी ज्ञानदेव राखुंडे यांच्या मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आबासाहेब नरसिंग नलवडे यांना पाच तर शिवाजी राखुंडे यांना चार मते मिळाले तरी उपसरपंच पदासाठी आबासाहेब नरसिंग नलवडे निवडून आले. यावेळी युवा नेते महेंद्र भैय्या पाटील मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे व ग्रामपंचायत सदस्य कुसुम शंकर सरडे ज्ञानेश्वर बाळासाहेब सोनवणे नानासाहेब शिवाजी घोंगडे विश्वास काका पाटील महादेव नलवडे महादेव निंबाळकर भागवत पाटील नागेश बोरकर लाला सरडे नानासाहेब सरडे बापू सावंत नागनाथ राखुंडे रामा रोडगे अंबादास पाटील कुलदीप पाटील पांडुरंग कोरे गणेश जाधव दत्तू सरडे उत्तम सरडे नामदेव सपकाळ संपत नलवडे दादासाहेब सरडे महादेव लोंढे बबन सरडे संतोष घोंगडे विठ्ठल शिंदे विठ्ठल चोपडे दादा डोंगरे दिगंबर पवार योगेश शिंदे दीपक दंडवते भीमराव पांढरे हरिदास सोनवणे बाबा सोनवणे बापू सोनवणे रुद्र स्वामी बाळासाहेब हजारे समाधान हजारे निलेश मोहिते मंथन सोनवणे समाधान शिंदे प्रदीप आल्हाट साहेबराव धुमाळ किरण जाधव शिवाजी पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया साठी किरणकुमार खारे शिल्पा बायनेवाड श्रीकांत बारकुंड यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!