करमाळा शिवसेना शहरप्रमुखपदी प्रविण कटारिया

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहर प्रमुख म्हणून प्रविण कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामना मध्ये प्रसिध्द झाले आहे. करमाळा शहर प्रमुख पदाची जागा गेल्या अडीच वर्षापासून रिक्त होती. या पदासाठी अनेकजणांची रस्सीखेच चालू होती. यामध्ये कटारिया यांनी बाजी मारली आहे. कटारिया यांनी शहरप्रमुख पदावर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव पाहता पक्षाने त्यांचेवर पुन्हा एकदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यानूसार करमाळा शहर प्रमुख म्हणून प्रविण कटारिया यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत शिवसैनिकांनी केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टाकलेली शहरप्रमुख पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून शहरात वॉर्डनिहाय शिवसेनेच्या शाखा करण्यात येतील. एवढेच नाहीतर घर तेथे शिवसेना हे अभियानही राबविले जाईल. शहरात शिवसेनेचा मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. शहरात संवाद मेळावे आयोजित करून नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेने मार्फत आंदोलन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.…प्रविण कटारिया (शहरप्रमुख शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!