रखमाबाई रामभाऊ शिंदे यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.६ : पोथरे येथील श्रीमती रखमाबाई रामभाऊ शिंदे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रघुराव शिंदे, बबन शिंदे व गोपिनाथ शिंदे यांच्या मातोश्री होत्या.
रखमाबाई शिंदे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पोथरे येथील शिंदे वस्ती वर शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
