केम येथील विठ्ठल कुंभार यांचे निधन

केम(संजय जाधव) : केम येथील विठ्ठल ज्ञानदेव कुंभार (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार नातू, तीन नाती असा परिवार आहे.
विठ्ठल कुंभार यांनी आपल्या कुंभार व्यवसायातून तब्बल ७५ वर्षे शेतकऱ्यांची सेवा केली. उत्कृष्ट कलाकार म्हणूनही त्यांची परिसरात ओळख होती. ते स्वतः शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करत असत. त्यांच्या हातून साकारलेल्या गणेशमूर्तींना केम व परिसरात मोठी मागणी होती.
मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ते सहशिक्षिका मीनाक्षी कुंभार यांचे वडील होत.
