जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३: सरकोली (ता. पंढरपूर) या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील वैभव सुरवसे याने कुस्तीमध्ये 17 वर्ष वयोगट व 71 किलो वजन गटात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे . त्याची विभागीय कुस्तीसाठी निवड झाली त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुनील जाधव तसेच सहशिक्षक अंकुश खाने,  भागवत सर व जगदाळे सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर वैभवला मार्गदर्शन करणारे  जितेश कांबळे व  शुभम पाटील यांचाही सत्कार  शरद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाने क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हास्तरामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यावेळी वैभव सुरवसे यास विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!