गुरुकुल स्कूलमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोणातून विविध प्रयोगांचे सादरीकरण – 1195 विद्यार्थ्यांचा सहभाग..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये १६ व १७ डिसेंबर रोजी वैज्ञानिक दृष्टीकोणातून विविध प्रयोगांचे फेस्टिवलमध्ये आयोजन करण्यात आले, यामध्ये 1195 विद्यार्थ्यानी यात सहभाग नोंदविला आहे. सदर फेस्टिव्हल उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार समीर माने हे होते, याप्रसंगी तसेच प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, दिलीप तिजोरे सहाय्यक निबंधक करमाळा, डॉ.निलेश मोटे सर व श्री.झिंजाडे हे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयाची आवड निर्माण करून देण्यासाठी व त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासण्यासाठी गुरुकुल पब्लिक स्कूलने या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यशस्वी ठरले. या फेस्टिवल मध्ये 1195 विद्यार्थ्यानी सहभाग होता. विविध प्रकारच्या प्रयोगांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले होते.
यावेळी पहिल्या दिवशी ६५५८० रुपयांची तर दुसऱ्या दिवशी ७५६९० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली तसेच विविध राज्याच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद पालकांनी या फेस्टिवल मध्ये घेण्यास मिळाला. यामध्ये फास्टफूडचा फूडस्टॉल मध्ये समावेश नव्हता. आरोग्यच्या दृष्टीने रुचकर पदार्थांचा समावेश याठिकाणी ठेवण्यात आला होता..
या फेस्टिवल मधील महत्त्वचे आकर्षण म्हणजे समुद्री जलजीवन व भारतीय संस्कृतीचा जिवंत देखावा.या देखाव्यात इयत्ता चौथी च्या इतिहासापासून म्हणजे आदिमानव ते बुद्धिमान मानवाची निर्मिती, त्यावेळेस चे ग्रामीण जीवन, संतांची परंपरा, शिवाजी महाराजांचा इतिहास, समाजसुधारक व आताची मिसाईल निर्मिती आधुनिकता असा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता.
या फेस्टिव्हलसाठी संस्थेचे संस्थापक प्रा.नितीन भोगे व संस्थापिका रेश्मा भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे परिश्रम व टिमवर्क यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.