शेलगाव (वांगी) व अर्जुननगर येथे देशी-विदेशी दारू पकडली..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता. ९ : शेलगाव (वांगी) (ता. करमाळा) येथे देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यास पोलीसांनी रंगेहात पकडले. हा प्रकार काल (ता. ८) ला सायंकाळी ५-३० वाजता घडला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर घुगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की शेलगाव (वांगी ) येथे एकजण देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याचे समजलेवर तिथे गेलो असता, तिथे देवराव भाऊराव सानप (वय ७४, रा. शेलगाव) हा दारू विक्री करताना आढळला आहे. त्याच्याकडे ७०० रूपये किमंतीच्या १९ संत्रा देशी दारू बाटल्या मिळाल्या तसेच ७५० रूपये किमंतीच्या १० मॅकडॉल रमच्या विदेशी दारू बाटल्या सापडल्या. त्याच्याकडून १४५० रूपयेचा माल सापडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.
अर्जुननगर येथे देशी दारू पकडली…अर्जुननगर (ता. करमाळा) येथे देशी दारू विक्री करणाऱ्यास पोलीसांनी रंगेहात पकडले. हा प्रकार काल (ता. ८ ) ला सायंकाळी ६-३० वाजता घडला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश सावळाराम काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की अर्जुननगर येथे एक जण देशी दारू विक्री करत असल्याचे समजलेवर तिथे गेलो असता, तिथे कृष्णा दशरथ घरबुडवे (रा. मिरगव्हाण) हा देशी दारू विक्री करताना आढळला आहे. त्याच्याकडे ८४० रूपयच्या १२देशी दारू बाटल्या मिळाल्या असून तो सर्व माल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.